सोप्या सुगम पद्धतीने वारकरी कीर्तनाचे प्रशिक्षण 

हरिकीर्तन प्रबोधिनीचा ऑंन लाईन कीर्तन अभ्यासक्रम 

प्रबोधक अभ्यासक्रम फी खालील प्रमाणे  आहे. 

हा अभ्यासक्रम  एका वर्षाचा  आहे.


प्रवेश शुल्क : रु. १,०००/- मात्र


प्रशिक्षण शुल्क : रु. ५००/- मात्र (प्रति महिना)


You Tube Membership: Rs.89/- (प्रति महिना)

आमच्या युट्युब चॅनेल चे मेंबर होण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करावे आणि त्यानंतर जॉईन या बटनावर क्लिक करून तेथील हितचिंतक या पहिल्या लेव्हलची मेंबरशिप घ्यावी.


प्रवेश घेताना रु. १,०००/- प्रवेश शुल्कासोबत प्रशिक्षण शुल्क रु. १,५००/- मात्र भरणे अपेक्षित आहे म्हणजे आपणास एकूण रु. २,५००/- मात्र एकत्र भरावे लागतात.


दर महिन्याला दहा तारखेच्या अगोदर आपणास त्या महिन्याचे मासिक प्रशिक्षण शुल्क रु.५००/- मात्र जमा करणे आवश्यक आहे.


अशा रीतीने या अभ्यासक्रमाचे एकूण वार्षिक शुल्क रु. ७,०००/- मात्र भरावे लागते.

आपण 9356835881या नंबर वर गुगल पे अथवा फोन पे करू शकता.


अर्ज आणि फी जमा झाल्यावर आपणास अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. खालील लिंक वर आपण प्रवेश अर्ज भरू शकता.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeev0GHvIzQlkas7JTinBN3TzQZCmWujcSbdVJDyX1qU9Azjg/viewform 



आपणास काही विचारायचे असल्यास ९५९४९६१८६४ या क्रमांकावर 

महाराजांना फोन करावा.



Bank details 



Name – Harikirtan Prabodhini



Bank Name – Janata sahakari bank Ltd., Pune



Branch – Karve Road Branch



Bank Account No - 007230100003193



Account Type – Current  Account



Swift Code- IFSC code JSBP0000007



आपणास शुभेच्छा


नियमित अभ्यासक्रमासोबत आमचे अन्य अभ्यासक्रम

उपलब्ध कीर्तने 

भक्त ऐसे जाणा जे देही उदास 

नाम तेचि रूप रूप तेचि नाम 

नको नको मना  गुंतू मायाजाळी 

आता तरी पुढे हाची उपदेश 

हेचि  दान देगा देवा 

आवडीने भावे हरीनाम घेसी 

काल्याचे कीर्तन 

प्रवेश फी - रु. १,०००/-

मासिक फी - रु. २५०/-

मासिक चार वर्ग - दर बुधवारी 

पेटीवादनाचे प्रशिक्षण

विविध अलंकार व पलटे 

रामकृष्ण हरि भजन 

रूप पाहता लोचनी 

सुंदर ते ध्यान 

मूळ अभंग चाल 

विठोबा रखुमाई भजन 

प्रमाण चाली गायन  

प्रवेश फी - रु. १,०००/-

मासिक फी - रु. २५०/-

मासिक चार वर्ग - दर शुक्रवारी 

विणेकरी पंचपदी कीर्तनकार पंचपदी 

रामकृष्ण हरि भजन 

रूप पाहता लोचनी 

सुंदर ते ध्यान 

मूळ अभंग चाल 

विठोबा रखुमाई भजन 

प्रमाण चाली गायन 

प्रवेश फी - रु. १,०००/-

मासिक फी - रु. २५०/-

मासिक चार वर्ग - दर रविवारी 

शिबिराचे छायाचित्र आणि विडीयो माध्यमातून दर्शन  घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

अशा नवनवीन सूचना आणि विशेष माहिती प्राप्त करण्यासाठी सोबतच्या लोगोवर क्लिक करून आमच्या व्हॉटस् अँप ग्रुपला 

जॉइन व्हा!

समर्थक 

  समर्थक होण्यासाठी  येथे क्लिक करावे.

वारकरी कीर्तन अभ्यासक्रम

कृपया अभ्यासक्रम पहाण्यासाठी शेजारच्या बाणावर क्लिक  करा. 

मार्गदर्शक  मंडळाची  माहिती घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

मार्गदर्शक मंडळ

sant chokhamela fine.mp4
amitabh Project.mp4

दीपक महाराज जेवणे यांची साहित्य संपदा 

कीर्तनाचा अभ्यास कसा करावा

  याची माहिती घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

मान्यवरांचे आशीर्वाद आणि भेटी 

आनंदाचे डोही आनंद तरंग...

शिबिराविषयी...

 

किर्तन प्रबोधनी द्वारा आयोजित कीर्तन शिबिरामध्ये कीर्तन सादर करण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे पंढरपूर या आध्यात्मिक नगरीमध्ये हे भाग्य प्राप्त झाले. त्याबद्दल प्रथमतः गुरुवर्य ह भ प दीपक महाराज जेवणे यांचे मनापासून आभार.

एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे म्हणजे आयोजकापासून संयोजकापर्यंत सर्वांची धावपळ उडते. परंतु शांत आणि संयमी वृत्तीने दीपक महाराज जेवणे यांनी प्रत्येक प्रश्न हाताळला आणि शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाले.

हरिभक्त परायण प्रसाद महाराज माटे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून पंचपदी चा सराव कसा करावा आणि पंचपदीच्या विविध चाली खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितल्या. ज्या आता नित्य स्मरणात राहतील आणि त्याप्रमाणे सराव केल्यास आमच्या पंचपदी मध्ये निश्चित सुधारणा होईल.

व्यवस्थापक श्री. ह.भ.प.मोकाशी महाराज यांनी सुयोग्य नियोजनाद्वारे व्यवस्था सांभाळली. सदैव सहकार्यास तत्पर असणारे व्यक्तिमत्व,शिस्त आणि संयम यांचा समतोल साधत शिबिर यशस्वी करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

लावण्याताईने सर्व कीर्तनकाराची शूटिंग व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. या शूटिंगच्या माध्यमातूनच आपले कीर्तन आपल्या संग्रही आता कायमस्वरूपी राहण्यास मदत होणार आहे.

प्राध्यापक मिलिंद जोशी सर आणि त्यांच्यासह सर्व परीक्षकांनी नवोदित कीर्तनकाराचे परीक्षण करून त्यांना योग्य त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन केले.

प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील सर्व कीर्तनकारांचे कीर्तन सादरीकरण खूपच चांगल्या पद्धतीने झाले. त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

माझे कीर्तन सादरीकरणाची ही दुसरीच वेळ होती. टाळकरी, मृदुंग वादक, पेटी वादक, गायनाचार्य यांनी खूप सुरेख साथ दिली.

कीर्तन सादरीकरनानंतर मान्यवरांनी भेटून प्रत्यक्ष दिलेल्या प्रतिक्रिया. त्याचप्रमाणे सहकारी कीर्तनकाराचे अभिप्राय प्रेरणादायक आणि उत्साह वर्धक होते.

माझ्या भविष्यकालीन वाटचालीसाठी पाठीवर मिळालेली ही कौतुकाची थाप माझ्या सदैव स्मरणात राहील.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

 

ह.भ.प. संदीप महाराज ढाकणे

औरंगाबाद.

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल..


अखिल ब्रम्हांड नायक पांडुरंग परमात्मा यांच्या चरणतिर्थाजवळ दोन दिवसीय चाललेले किर्तन शिबिर आणि या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी अतिशय तळमळीने मेहनत घेतली,यामध्ये गुरुवर्य दिपक महाराज जेवणे यांनी जे नियोजन केले ते खरेच जबरदस्त आणि कौतुकास्पद आहेच, सर्वांना सोबत घेणे ,कामे वाटून देणे व शिबिर यशस्वी करणे  म्हणावे तेवढे सोपे काम नाही.

या मध्ये हभप प्रसाद महाराज  यांनी आम्हा

सर्व  नवोदित किर्तनकाराना जे मार्गदर्शन केले ते अतिशय महत्त्वाचे आहेच.

हरिकीर्तन प्रबोधिनी चे व्यवस्थापक हभप राहुल महाराज मोकाशी यांनी केलेली जेवण व्यवस्था असेल किंवा कीर्तन काराची कीर्तन व्यवस्थापण असो सर्व काही व्यवस्थित..

हभप मिलिंद महाराज जोशी यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण पद्धती आणि त्यांचे आधुनिक व नवोदित कीर्तन कारांकडून च्या अपेक्षा हे सर्व भारावून टाकणारे क्षण..

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंदाताईचे नवोदित कीर्तन कराच्या पाठीवर असलेली मायेची थाप,

लावण्यानी शिबिराचा प्रत्येक क्षण व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी द्वारे आपल्या कडे सुरक्षित ठेवला आहे तिचे कौशल्य

सर्व काही कौतुकास्पद

    खरेच

"अवघा रंग एक झाला"

पंढरपूरच्या या पवित्र तीर्थस्थळाहुन गावाकडे निघालेला प्रत्येक जण आपल्या सोबत नक्कीच एक वेगळी चैतन्य शिलता घेऊन जात आहे

या पाठीमागे उभी आहे "हरिकीर्तन प्रबोधिनीची तळमळ "

या मुळेच हरिकीर्तन प्रबोधिनीच्या सर्व सन्माननीय यांचे मनःपूर्वक आभार.

हरिकीर्तन प्रबोधिनीच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाहीत.

 

ह.भ.प रामदासजी महाराज,

पूर्णा


2930 ऑक्टो श्री.क्षेत्र पंढरपूर येथे 2 दिवसीय कीर्तन प्रशिक्षण शिबिर हरी कीर्तन प्रबोधिनी (ह.भ.प.दीपक महाराज जेवणे) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते, अतिशय सुंदर पार पडले. नवोदित शिष्यांना कीर्तन कसे करायचे, कीर्तनात समय सूचकता, सुरूवात मध्य व शेवट, पंचपदी कोणती व कशी म्हटली पाहिजे, भाषा शैली कशी असली पाहिजे, पेहराव(धोती,कुर्ता,फेटा,उपरणे), वर्तन कसे असले पाहिजे, हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार कसा केला पाहिजे,

श्री.संत तुकाराम महाराज गाथा, श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पाठांतर असणे गरजेचे आहे. यासाठी ह.भ.प.दीपक महाराज जेवणे, ह.भ.प.मिलिंद महाराज, ह.भ.प. माटे महाराज, राहुल मोकाशी, ह.भ.प.चंदाताई (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित), यांनी खूप सखोल मार्गदर्शन केले

व नवोदित कीर्तनकार घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

समारोपा साठी श्री.संत नामदेव महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प. निवृत्ती महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. नवोदित कीर्तनकारानी अतिशय सुंदर कीर्तन केले सर्वांचे मला अतिशय कौतुक वाटले.

श्लोकांचे पाठांतर, गायन, उदाहरण, बॉडी लँग्वेज, धाडस, ड्रेस कोड(पेहराव), सूत्रबद्धता, अतिशय सुंदर.

तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक, शुभेच्छा व अभिनंदन

मला या शिबिरात येण्याची संधी मिळाली व ज्यांनी हे सर्व घडउन आणले त्या सर्व श्री.हरिकिर्तन प्रबोधिनी परिवाराचे व ह.भप.दीपक महाराज जेवणे यांचे खूप खूप धन्यवाद व आभार. यापुढे या परिवारात माझे पण पूर्णपणे योगदान असेल.

धन्यवाद.

हभप धनंजय शेंडे,

गुजरात